Sanjay Shirsat

Sanjay Shirsat : संकटमोचकांनी शेपटीला चिंधी बांधून महायुतीत व्यत्यय आणू नये; शिरसाटांची महाजनांवर टीका

449 0

नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेत सुरु असलेल्या वादात आता भाजपची एन्ट्री होतांना पाहायला मिळत आहे. नाशिक भाजपचा बालेकिल्ला असून, नाशिकमध्ये तीन आमदार आणि जवळपास 70 नगरसेवक भाजपचे असल्याचा दावा करणाऱ्या गिरीश महाजन यांनी केला आहे. यावरून संजय शिरसाट यांनी खोचक शब्दात टीका केली आहे. संकटमोचकांनी शेपटीला चिंधी बांधून महायुतीत व्यत्यय आणू नये असे शिरसाट म्हणाले आहेत.

गिरीश महाजन यांच्या वक्तव्याने नाशिकच्या जागेवरुन महायुतीत वादाची ठिणगी पडतांना पाहायला मिळत आहे. नाशिक भाजपचा बालेकिल्ला आहे. नाशिकमध्ये तीन आमदार आणि जवळपास 70 नगरसेवक भाजपचे आहेत. त्यामुळे नाशिक हा भाजपचाच बालेकिल्ला आहे असं गिरीश महाजनांनी म्हटलंय. तर, ते संकटमोचक आहेत, त्यांनी शेपटीला चिंधी लावून महायुतीत व्यत्यय आणू नये असा टोला संजय शिरसाटांनी लगावला आहे. तसेच, जे रामराज्य सुरू आहे ते सुरू राहू द्या असेही शिरसाट म्हणाले आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Yavatmal News : उष्णतेमुळे कोळसा डेपोला भीषण आग; 10 हजार टन कोळशाची झाली राख

Weather Update : महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाने ‘या’ जिल्ह्यांना दिला हाय अलर्ट

Clove Side Effects : ‘या’ लोकांनी उन्हाळ्यात चुकूनही करू नये लवंगाचे सेवन; होतील ‘हे’ दुष्परिणाम

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मिळाला दिलासा ! दानवे, खैरेंचं अखेर झालं मनोमिलन

Bank Fraud : राज्यातील ‘या’ बँकेतील घोटाळा उघड; ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण

Pune Crime : पुण्यात देशी दारूच्या दुकानात तुफान राडा; ‘त्या’ व्यक्तीने वेधले सगळ्यांचे लक्ष

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!