Maharashtra Politics

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मिळाला दिलासा ! दानवे, खैरेंचं अखेर झालं मनोमिलन

415 0

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगमधून (Maharashtra Politics) एक मोठी बातमी समोर आली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी आज माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची भेट घेतली आहे. आज दोघांमध्ये मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळालं आहे. दानवे यांनी चंद्रकांत खैरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. खैरे यांनी देखील दानवेंचं पेढा भरवून स्वागत केलं आहे. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये बराचवेळ चर्चा देखील झाली.

दानवेंनी दिली प्रतिक्रिया
या भेटीनंतर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वाद होते पण ते वैचारिक हक्काचे होते. आता एकत्र काम करू आणि जिंकू आम्ही दोघेही मित्रच फक्त आमच्या आपेक्षा होत्या त्या दाखवल्या असं दानवे यांनी म्हटलं आहे.

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला आला आहे. या मतदारसंघातून ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. मात्र याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी अंबादास दानवे देखील इच्छूक होते. मात्र त्यांना तिकीट नाकारण्यात आले होते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Bank Fraud : राज्यातील ‘या’ बँकेतील घोटाळा उघड; ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण

Pune Crime : पुण्यात देशी दारूच्या दुकानात तुफान राडा; ‘त्या’ व्यक्तीने वेधले सगळ्यांचे लक्ष

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!