बुलाढाणा : बुलाढाणा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये नांदुरा अर्बन बँकेला कनिष्ठ संगणक अधिकाऱ्यानेच (Bank Fraud) तब्बल पाच कोटी 45 लाख रुपयांना गंडा घातला आहे. या प्रकरणात नांदुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. गजानन शर्मा असे संगणक अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याने इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीनं ही रक्कम इतर बँकेच्या विविध खात्यात ट्रान्सफर केली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
नांदुरा अर्बन बँकेचा कनिष्ठ संगणक अधिकारी गजानन शर्मा यानं बँकेत कोट्यवधी रुपयांचा अपहार केला आहे. त्याने इतर कर्मचाऱ्यांच्या संगनमतानं बँकेतील तब्बल पाच कोटी 45 लाख रुपयांची रक्कम इतर बँकांच्या विविध खात्यात ट्रान्सफर केली. ही बाब बँकेच्या संचालकांच्या लक्षात येताच शर्मा यांच्याविरोधात नांदुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपीला अटक केली आहे.
ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण
बँकेची फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. यानंतर बँकेतील ठेवीदारांनी बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी केली. घडलेल्या प्रकारानंतर यावर बँक व्यवस्थापनाने प्रतिक्रिया दिली. कोणीही घाबरून जाऊ नये, ठेवीदारंच्या ठेवी सुरक्षीत असल्याचा दावा बँकेकडून करण्यात आला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune Crime : पुण्यात देशी दारूच्या दुकानात तुफान राडा; ‘त्या’ व्यक्तीने वेधले सगळ्यांचे लक्ष