Pune Crime

Pune Crime : पुण्यात देशी दारूच्या दुकानात तुफान राडा; ‘त्या’ व्यक्तीने वेधले सगळ्यांचे लक्ष

627 0

पुणे : पुण्यातून (Pune Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये पुण्यातील एका देशी दारूच्या दुकानात तुफान राडा झाल्याचे पाहायला मिळाले. ही संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पुण्याजवळील वाघोलीच्या केसनंद रोडवरील एका देशी दारूच्या दुकानात हा राडा झाला. मात्र या सगळ्या गोंधळामध्ये एका व्यक्तीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

काय घडले नेमके?
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती देशी दारूच्या दुकानात येते. ती एका टेबलजवळ जाते. तिथं सुरुवातीला वाद घालते आणि एका व्यक्तीला मारते. दुकानात बसलेल्या त्या व्यक्तीसोबत आणखी दोन व्यक्ती असतात. मग तिघंही त्या एका व्यक्तीला भिडतात. तीन विरुद्ध एक अशी फाईट होते. तीन तीन व्यक्तींनाही एकटी व्यक्ती जुमानत नाही. काही वेळाने ती त्या तिघांवरही दारूच्या बाटल्या फोडते. या भांडणात पडण्याची, ते सोडवण्याची हिंमतही कुणी करत नाही. काही वेळाने फायटिंग थांबते. सर्वजण शांत होतात. दुकानात ज्या व्यक्तीमुळे राडा झाली ती व्यक्ती कुणालातरी फोन करताना दिसते, नंतर ती दुकानातून निघून जाते. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

‘त्या’ व्यक्तीने वेधलं लक्ष
या राड्यावरून तुम्ही तुमची नजर थोडी वळवाल, दुकानाच्या कोपऱ्यात फिरवला तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल. राडा सुरू झाल्यापासून ते शेवटपर्यंत एक व्यक्ती कोपऱ्यात बसली आहे. इतकं मोठं भांडण होऊनही ती व्यक्ती काही जागची हलली नाही. अगदी शांतपणे निवांत बसून ती दारू पित आहे आणि जणू काही फिल्म पाहत आहे, असा तो राडा पाहत आहे. हा राडा नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!