Supriya And Sunetra

LokSabha : नणंद विरुद्ध भावजय लढत रंगणार! बारामतीमधून सुनेत्रा पवारांना उमेदवारी जाहीर

523 0

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (LokSabha) महाविकास आघाडी आणि महायुतीकडून उमेदवारांची घोषणा होऊ लागली आहे. पहिल्या टप्प्यासाठी उमेदवार जाहीर असताना सर्वांचं लक्ष बारामती मतदारसंघाकडे लागलं होत. मात्र अद्याप या मतदार संघात महायुतीकडून उमेदवार जाहीर करण्यात आला नव्हता. याचं कारण या मतदारसंघात सुप्रिया सुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार असणार हे स्पष्ट होतं. यानंतर आता अखेर अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची बारामती लोकसभेसाठी अधिकृत घोषणा केली.

अजित पवार गटाने दुपारी पत्रकार परिषद घेत महादेव जानकर यांना परभणीतून उमेदवारी देत असल्याचं जाहीर केलं होतं. यावेळी बारामतीचा उमेदवार त्यांनी जाहीर केला नव्हता. यादरम्यान जयंत पाटील यांनी शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर करताना सुप्रिया सुळे बारामतीमधून लढतील असं स्पष्ट केलं होतं. यानंतर सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद बोलावत सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गटाने उमेदवार जाहीर केल्याने बारामतीतमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार लढत होणार हे मात्र नक्की. या दोघींमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Govinda : गोविंदाचा पत्ता कट; उत्तर पश्चिम मतदार संघात दिसू शकते मराठमोळी अभिनेत्री?

Bharat Ratna Award : भारतरत्न पुरस्काराचे मानकरी ठरले ‘हे’ दिग्गज; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूच्या हस्ते झाले वितरण

Ajit Pawar : आधी विरोध केला आता प्रचार करणार; अजितदादांच्या विरोधकांना यंदा करावा लागणार त्यांच्याच उमेदवारांचा प्रचार

LokSabha : शरद पवार गटाची पहिली उमेदवार यादी जाहीर

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!