विजय शिवतारेंचं बंड शमलं; वर्षा बंगल्यावरच्या ‘त्या’ बैठकीत नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण INSIDE STORY

4539 0

पुरंदर: मागील काही दिवसांपासून बारामती लोकसभा मतदार संघ आणि त्याची निवडणूक हा चर्चेचा विषय ठरला आहे. याला कारण म्हणजे अजित पवार यांच्याविरोधात पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी पुकारलेलं बंड अजित पवार यांचा उमेदवार कशा निवडून येतो तेच बघतो असं म्हणत अपक्ष निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी शिवातारे यांनी केली होती. 

बुधवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासमवेत विजय शिवतारे यांची बैठक झाली. यावेळी आमदार भरत गोगावले देखील उपस्थित होते. या बैठकीत पुरंदरचे प्रश्न सोडविण्याचे आणि पुरंदरला निधी देण्याचे आश्वासन मिळाल्यामुळे शिवतारे यांनी माघार घेतली आहे.

मागील काही दिवसांपासून विजय शिवतारे यांनी अजित पवारांविरोधात चांगलेच रान उठवलं होतं. अजित पवारांवर टोकाची टिका करत लोकसभेसाठी आपली अपक्ष उमेदवारी जाहीर केले होती. त्याच बरोबर बारामती मतदार संघात प्रचार दौरे भेटीगाठी सुरू केल्या होतं.

विजय शिवतारेंच्या उत्साही कार्यकर्त्यांनी भावी खासदार म्हणूनही सासवडमध्ये बॅनर देखील झकळकविले होते.त्यामुळे बारामती लोकसभा मतदार संघात तिरंगी लढत होणार असा कयास राजकीय वर्तुळात लावण्यात येत होता.

दरम्यान, खडकवासल्याचा दौरा रद्द करून विजय शिवतारे मुंबईला रवाना झाले होते. त्यानंतर काल रात्री “रात्रीस खेळ चाले” प्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्ठाई पुन्हा एकदा कामी आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात यशस्वी बैठक पार पडली आणि सकाळी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

 

ज्या गुंजवणीच्या पाणी प्रश्नानं शिवतारेंना आमदार,आणि त्यानंतर मंत्री केल. ज्या उपोषणाने शिवतारे यांना किडणीचा आजार जडला त्या रखडलेल्या गुंजवणी योजनेला निधीची तरतूद लवकर करण्याचे आश्वासन दिल्याची खात्रीशीर माहिती समोर येत आहे. त्यामुळं या योजनेला गती मिळणार, तसेच पुरंदर विमान तळाचा प्रश्न मार्गी लागणार,दिवे येथील राष्ट्रीयबाजार प्रश्न मार्गी लागणार,भोर तालुक्यातील उत्रोली येथील नियोजित एमआयडीसी होण्यासाठी तातडीने पाऊले उचलली जाणार त्याच बरोबर बारामती येथील बहुचर्चीत कऱ्हाटी मोरगांव लोणी भापकर या पाण्यापासून वंचित असलेल्या गावासाठी नीरा नदीवरून उपसासिंचन योजना करण्यात येणार. त्याच बरोबर सर्वात महत्वाचे म्हणजे आगामी विधानसभा निवडणूकीत महायुतीचे उमेदवार विजय शिवतारेंच आणि त्याची घोषणा दस्तुरखुद्द अजित पवार हेच सासवडच्या पालखी तळावर करतील अश्या काही महत्वाच्या गोष्टीवर तडजोड होवून विजय शिवतारे लढाईच्या आगोदरच यशस्वी विजयी माघार घेतल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्वगोष्टी प्रचार सभेच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालखी तळावर जाहीर करणार अशीही माहिती मिळत आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide