छत्रपती संभाजीनगर: बहिणीच्या प्रेम विवाहाला मदत केल्याचा राग डोक्यात ठेऊन भावाने (Chhatrapati Sambhajinagar) 24 वर्षाच्या तरुणाची निर्घृणपणे हत्या केली आहे. मुख्य आरोपींनी मृत तरुणाच्या डोक्यावरून तब्बल चार वेळा बोलेरो कार घातल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला असून या घटनेमुळे संभाजीनगरात एकच खळबळ उडाली आहे. संभाजीनगर मधील शेंदूरवादा- सावखेडा महामार्गावर ही घटना घडली असून पवन शिवराम लोढे (वय 24 वर्षे) असे मृत तरुणाचे नाव आहे.
नेमके काय घडले?
धक्कादायक म्हणजे पवनचे पुढच्या आठवड्यात विवाह असल्याने वडिलांसोबत बँकेतून पैसे आणायला बाहेर असतानाच त्याच्या दुचाकीला बोलेरो गाडीने धडक दिली. यानंतर पवन खाली पडल्यानंतर त्याच्या अंगावर चार वेळा बोलेरो कार घालून त्याची हत्या करण्यात आली आहे. संभाजीनगरच्या वाळुज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेंदूरवादा- सावखेडा महामार्गावर ही घटना घडली असून आरोपीच्या बहिणीचा प्रेमविवाह व्हावा यासाठी मृत तरुणाकडून प्रयत्न करण्यात आले होते. या प्रकरणाचा डोक्यात राग धरून ही हत्या करण्यात आली आहे.
मृत पवन हा शेतकरीअसून त्याच्या मामाचा मुलगा विशाल लक्ष्मण नवले याने संशयित आरोपी सचिन वाघचौरे, विशाल वाघचौरे यांच्या बहिणीशी पळून जावून विवाह करण्याकरिता पवन यांनी मदत केली होती. याचाच राग डोक्यात धरून संशयित आरोपींनी बोलेरोने पवनच्या दुचाकीला धडक दिली. एवढेच नाहीतर त्याच्या अंगावर चार वेळा बोलेरो कार घालण्यात आली. यानंतर त्याला तातडीने रुग्नालयात दाखल करण्यात आले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. वाळुज पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune Satara Toll : पुणे-सातारा प्रवास महागला
Satara Loksabha : शरद पवारांना मोठा धक्का! श्रीनिवास पाटलांनी सातारा लोकसभा लढवण्यास दिला नकार
Smita Wagh : चर्चेतील चेहरा : स्मिता वाघ
Govinda : अभिनेता गोविंदा बनणार का राजकारणात पुन्हा एकदा हिरो नंबर 1?