Sadanand Date

Sadanand Date : राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या डायरेक्टर जनरलपदी सदानंद दाते यांची नियुक्ती

742 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मोठे प्रशासकीय बदल करण्यात आले आहेत. आयपीएस अधिकारी सदानंद दाते (Sadanand Date) यांना राष्ट्रीय तपास यंत्रणाच्या डायरेक्टर जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर, पियूष आनंद यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण दलच्या डायरेक्ट जनरल पदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून बुधवारी 27 मार्च रोजी या नियुक्तांबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत.

कोण आहेत सदानंद दाते?
सदानंद दाते हे 1990 बॅचच्या महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. ते छत्तीसगढच्या गडचिरोलीमध्ये नक्षली मोर्चाच्या काळातही तैनात होते. तर, फेब्रुवारीमध्ये सीआरपीएफमध्ये त्यांना आयजीपदी बढती मिळाली होती. त्यांना सीआरपीएफचे स्पेशल आयजी बनवले होते. त्यानंतर डीजी म्हणून ते सीआरपीएफमध्ये पाच वर्ष नियुक्त होते. आता त्यांच्या हाती एनआयएची धुरा सोपवण्यात आली आहे. आयपीएस अधिकारी सदानंद दाते हे त्यांनी घेतलेल्या कठोर निर्णयांमुळं अनेकदा चर्चेत राहिले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maharashtra Weather Update : राज्याच्या ‘या’ भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

Loksabha Election : ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर! 16 शिलेदारांच्या नावाची केली घोषणा

Share This News
error: Content is protected !!