IPL

IPL 2024 : आयपीएलचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर

939 0

मुंबई : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल 2024 (IPL 2024) ला 22 मार्चपासून सुरुवात झाली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने 17 दिवसांचं वेळापत्रक जाहीर केलं होतं. यात 21 सामने खेळवण्यात येणार आहेत. 17 फेब्रुवारीला भारतीय क्रिकेट बोर्डाने हे वेळापत्रका जाहीर केले होते. त्यानंतर आता बीसीसीआयने आयपीएल 2024 चं संपूर्ण वेळापत्रक जाहीर केलं आहे.

यंदाच्या आयपीएलमध्ये एकूण 74 सामने खेळवल जाणार आहेत. आयपीएलचा अंतिम सामना 26 मे रोजी चेन्नईच्या एमए चिदम्बरम स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातील वेळापत्रकात 21 सामन्यांचं नियोजन करण्यात आलं होतं. 22 मार्च ते 7 एप्रिलपर्यंत हे सामने होते. लोकसभा निवडणुकीच्या तारखांवर आयपीएलचं वेळापत्रक अवलंबून होतं.आता बीसीसीआयने आयपीएलच्या उर्वरीत सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. वेळापत्रकानुसार आयपीएलचे सर्व सामने भारतातच खेळवले जाणार आहेत.पहिल्या टप्प्यात 7 एप्रिलपर्यंत सामने आयोजित करण्यात आले होते. आता 8 एप्रिलपासून 26 मेपर्यंत दुसऱ्या टप्पा खेळवण्यात येणार आहे. 8 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकातना नाईट रायडर्सदरम्यान सामना खेळवला जाणार आहे.

13 शहरं आणि 74 सामने
यावेळचं आयपीएल तब्बल 13 शहरात खेळवण्यात येणार आहे. चेन्नई, बंगळुरु, मुंबई, हैदराबाद, जयपूर, कोलकाता, दिल्ली, मोहाली, अहमदाबाद आणि लखनऊ ही दहा प्रमुख शहर असतील. याशिवाय विशाखापट्टणम, गुवाहाटी आणि धर्मशाला इथेही काही सामने खेळवले जाणार आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Kangana Ranaut : चर्चेतली उमेदवार कंगणा राणावत

Ram Satpute : चर्चेतला उमेदवार राम सातपुते

Loksabha 2024 : आतापर्यंत भाजपचे 23 उमेदवार जाहीर; कोणाला मिळाली उमेदवारी अन् कोणाचा झाला पत्ता कट?

Satara News : धुलीवंदनाच्या दिवशी महाबळेश्वरमध्ये मोठा अपघात; टेम्पो 400 फूट दरीत कोसळला

IPL 2024 : अखेर ठरलं ! आयपीएलचा फायनल सामना ‘या’ दिवशी ‘या’ मैदानावर खेळवला जाणार

Ahmednagar Crime : अहमदनगर हादरलं ! रंगपंचमीच्या दिवशी पतीने पत्नीसह 2 मुलींना जिंवत जाळलं

Loksabha Election : अखेर ठाकरेंचं ठरलं ! सामनामधून उद्या लोकसभेच्या उमेदवारांची यादी होणार जाहीर

Ujjain Fire : उज्जैनच्या महाकाल मंदिरात भस्म आरतीवेळी गर्भगृहाला भीषण आग

Ram Satpute : भाजपचं पुन्हा धक्कातंत्र ! राम सातपुतेंना सोलापूरमधून उमेदवारी जाहीर

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!