Ujjain Fire

Ujjain Fire : उज्जैनच्या महाकाल मंदिरात भस्म आरतीवेळी गर्भगृहाला भीषण आग

1126 0

उज्जैन : उज्जैनमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये उज्जैनच्या (Ujjain Fire) महाकाल मंदिरात सोमवारी भस्म आरती सुरू असताना गर्भगृहात आग लागली. या आगीमध्ये मंदिराच्या पुजाऱ्यासह पाच जण होरपळले आहेत. या आगीच्या घटनेत जखमी झालेल्या भाविकांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. भस्म आरतीच्या वेळी अबीर-गुलाल लावला जात असताना ही घटना घडली.

काय घडले नेमके?
महाकाल मंदिरात सोमवारी आरती सुरू असताना हा प्रकार घडला आहे. गर्भगृहाला आग लागली. या आगीत पुजाऱ्यासह पाच जण होरपळले आहेत. अचानक आग लागल्यामुळे मंदिरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहेत. आगीत जखमी झालेल्या भाविकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.

आगीचं कारण अस्पष्ट
ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप समोर आलेले नाही. भस्म आरतीच्या वेळी अबीर-गुलाल लावला जात होता, याचदरम्यान ही घटना घडली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ram Satpute : भाजपचं पुन्हा धक्कातंत्र ! राम सातपुतेंना सोलापूरमधून उमेदवारी जाहीर

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!