Vijay Shivtare

Vijay Shivtare : 12 तारखेला 12 वाजता फॉर्म भरून 12 वाजवणार! शिवतारें आपल्या निर्णयावर ठाम

530 0

बारामती : सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगली आहे. महाराष्ट्रात तर या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. यादरम्यान बारामती मतदार संघ मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे. कारण या ठिकाणी नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगताना दिसणार आहे. मात्र एकनाथ शिंदे गटातील विजय शिवतारे यांच्या भूमिकेमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापुढील अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. विजय शिवतारे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.

शिवतारे निवडणूक लढवण्यावर ठाम
विजय शिवतारे यांनी 24 मार्च रोजी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली. महायुतीमध्ये बारामती हा मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे येण्याची शक्यता आहे. या जागेसाठी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांना तिकीट देण्यात आले आहे. याच कारणामुळे या जागेवर नणंद विरुद्ध भावजय असा सामना पाहायला मिळणार आहे. ही जागा जिंकण्यासाठी दोन्ही बाजूने जोमात तयार केली जात आहे. शिंदे यांच्या शिवसेनेतील नेते विजय शिवतारे हेदेखील बारामती या जागेवरून लढण्यावर ठाम आहेत. काहीही झालं तर मी निवडणूक लढवणार आहे, असं ते म्हणालेत.

‘या’ दिवशी भरणार अर्ज
माझ्याकडे मोठा पक्ष नाही, माझ्याकडे लोक नाहीत. माझ्याकडे फक्त सामान्य जनता आहे. याच जनतेला आवाहन करून प्रभावशाली सभा घेणार आहे. या सभांच्या माध्यमातून मी स्थानिक प्रश्नांवर बोलणार आहे. लोकांमध्ये जनजागृती करणार आहे. 12 तारखेला 12 वाजता मी माझा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. या पाशवी शक्तींचे मी 12 वाजवणार आहे, अशी घोषणा शिवतारेंनी दिली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Amravati News : अमरावतीमध्ये एसटी बसचा भीषण अपघात; 20 जण जखमी

Delhi Crime Video : दिल्ली हादरली ! भरदिवसा माथेफिरूने तरुणीवर केले चाकूने सपासप वार

Maharashtra Politics : ‘त्यांच्याकडे पैलवान तर आमच्याकडं…’; शरद पवारांच्या भेटीनंतर धंगेकरांची मोहोळांवर टीका

Manoj Jarange : मी माझ्या भूमिकेवर ठाम; अजूनही वेळ गेलेली नाही जरांगे पाटलांनी पुन्हा दिला सरकारला इशारा

Lok Sabha Election : काँग्रेसकडून लोकसभेसाठी उमेदवारांची चौथी यादी जाहीर

Matsyasana : मत्स्यासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!