Supriya Sule

Lok Sabha Elections : सुप्रिया सुळेंचं पुणे पोलीस अधीक्षकांना पत्र; म्हणाल्या…

361 0

पुणे : लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. प्रचाराला सुरुवात झाली असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी पुणे पोलीस अधीक्षकांना एक पत्र लिहीलं आहे. आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना तातडीनं पोलीस संरक्षण द्या अशी मागणी या पत्रातून सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

पत्रात नेमके काय म्हंटले?
रोहित पवार आणि युगेंद्र पवार हे निवडणूक प्रचारार्थ विविध ठिकाणी जात आहेत, संवैधानिक मार्गानं आणि शांतपणे नागरिकांशी संवाद साधत आहेत. मात्र काही ठिकाणी त्यांना दडपशाहीचा सामना करावा लागत आहे. घेराव घालून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांच्या जीवाला धोका आहे, त्यांना तातडीनं पोलीस संरक्षण देण्यात यावं अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी पुणे पोलीस अधीक्षकांना लिहीलेल्या पत्रात केली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : पोलीस दारात दिसताच माफियाचा हार्ट अटॅकने मृत्यू

Vakrasan : वक्रासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!