Devendra Fadanvis

Amravati Loksabha : अमरावती भाजप लढणार, फडणवीसांनी केले स्पष्ट

370 0

अमरावती : अमरावती लोकसभा (Amravati Loksabha) मतदारसंघात भाजपच लढेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी अकोल्यात स्पष्ट केले. त्यामुळे शिवसेनेकडून लढण्याच्या माजी केंद्रीय राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्या आशेवर पाणी फिरले. 2019 मध्ये नवनीत राणा अपक्ष विजयी झाल्या होत्या. त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. मात्र, नंतर राणा भाजपसोबत राहिल्या. आता त्या भाजपच्या उमेदवार असतील अशी चर्चा असताना अमरावती शिवसेनाच लढणार असा दावा अडसूळ यांनी केला होता.

अडसूळ पिता-पुत्र हे शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे कि, अमरावती मतदारसंघ भाजपच लढणार आहे. जो उमेदवार असेल तो भाजपच्या चिन्हावर लढेल. नवनीत राणा यांना उमेदवारी द्यायची की नाही हा निर्णय दिल्लीत होणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे.

अमरावतीच्या जागेवरून महाविकास आघाडीत अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही. काँग्रेस आणि शिवसेनेनेही (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ही जागा मागितल्याने पेच कायम आहे. त्यामुळे आता हा मतदार संघ महाविकास आघाडीमध्ये कोणाच्या ताब्यात जातो हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sushma Andhare : सुळेंनी माहेरी लूडबूड करू नये म्हणणाऱ्या चाकणकरांना अंधारेंनी दिले सडेतोड उत्तर; म्हणाल्या…

Accident News : होळीसाठी गावी निघालेल्या परप्रांतीय मजुरांचा दुर्दैवी मृत्यू

Crime News : 6 वर्षांच्या चिमुकलीसह बापाने स्वतःलादेखील संपवलं

Parvatasana : पर्वतासन म्हणजे काय ? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!