Pune Police

Pune Police : पुणे पोलिसांचा मोठा निर्णय ! सर्व राजकीय नेत्यांच्या…

374 0

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलिसांनी (Pune Police) जोरदार तयारी सुरु केली आहे. राज्यात कोणतंही गैरकृत्य होणार नाही याची जबाबदारी पोलिसांवर असून, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वेतोपरी प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे.

काय घेतला निर्णय?
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी विविध पक्षांचे राजकीय नेते, बांधकाम व्यवसायिक, सामाजिक कार्यकर्ते तसंच प्रतिष्ठित नागरिक यांची सुरक्षा काढून घेण्याचा आदेश दिला आहे. या पोलिसांचा वापर नियमित कामासाठी केला जाणार आहे. यामुळे 350 पेक्षा अधिक सुरक्षारक्षक आणि गार्ड खात्याला उपलब्ध होणार आहेत.

पुणे शहरात एकूण 110 लोकांना पोलीस सुरक्षा पुरवण्यात आली होती. त्यापैकी 85 जणांचे पोलीस संरक्षण काढून घेण्यात आलं आहे. यादरम्यान संवेदनशील ठिकाणी सुरक्षा कायम ठेवली जाणार आहे. पण जिथे गरज नाही अशा 23 ठिकाणांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. दरम्यान पुणे पोलिसांकडे 54 जणांनी सुरक्षा पुरवण्यासाठी अर्ज केला होता. पुणे पोलिसांनी हे सर्व अर्ज बाद केले आहेत. तसंच जे लोक खासगी पिस्तूल बाळगत आहेत त्यांना ती पोलीस ठाण्यात जमा करण्याचा आदेश दिला आहे. परवाना असला तरी ती जमा करावी असं सांगण्यात आलं आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Crime News : मुलीवरून 2 मित्रांमध्ये झाला वाद; गैरसमजातून मित्राने उचलले ‘हे’ पाऊल

Kolhapur Crime News : कोल्हापूरमध्ये 2 गटांमध्ये तुफान राडा; पोलिसांसमोरच केली दगडफेक

Dandasana : दंडासन म्हणजे काय ? त्याचे काय आहेत फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!