लोकसभेचा बिगुल वाजला! महाराष्ट्रात कधी होणार मतदान? जाणून घ्या एका क्लिकवर

471 0

 

संपूर्ण देशाचे लक्ष ज्या लोकसभा निवडणुकांकडे लागलेला आहे त्याच निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. लोकसभा निवडणूक 2024 हितेश भरात सात टप्प्यात तर महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात पार पडणार आहे. लोकसभा मुख्य आयुक्त राजीव कुमार, आयुक्त सुखविंदर संधू आणि ज्ञानेश कुमार यांनी या संदर्भातली माहिती आजच्या पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?

• पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

• दुसरा टप्पा 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी

• तिसरा टप्पा 7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

• चौथा टप्पा 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

• पाचवा टप्पा 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील 6 मतदारसंघ

लोकसभा 2024 ची मतदान प्रक्रिया महाराष्ट्रात 26 एप्रिल ते 25 मे पर्यंत पाच टप्प्यात पार पडणार आहे. तर १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत देशातील निवडणुका सात टप्प्यांत पर पडणार आहेत. या निवडणुकांचा निकाल 4 जून रोजी लागेल.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!