OTT

OTT : मोदी सरकारने OTT संदर्भात उचलले ‘हे’ मोठे पाऊल

1383 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फिल्म म्हणू नका, सीरियल म्हणून नका की वेब सीरिज… आता बऱ्याच लोकांचा मनोरंजनासाठीचा कल ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मकडे वाढला आहे. तुम्हीही ओटीटी प्लॅटफॉर्मवर काही पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण मोदी सरकारने ओटीटी प्लॅटफॉर्मविरोधात एक मोठे पाऊल उचलले आहे.

काय केली कारवाई?
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ओटीटी प्लॅटफॉर्मवर कारवाई केली आहे.18 ओटीटी प्लॅटफॉर्म ब्लॉक करण्यात आले आहेत. या ओटीटी प्लॅटफॉर्मशी संबंधित 19 वेबसाइट्स, 10 ॲप्स ज्यापैकी 7 गुगल प्लेवर आहे आणि 3 अ‍ॅपल स्टोअरवर आहेत तसंच 57 सोशल मीडिया हँडल देशभरात ब्लॉक केले गेले आहेत. अश्लील आणि आक्षेपार्ह व्हिडीओ दाखवल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी या ओटीटी प्लॅटफॉर्मला आक्षेपार्ह कंटेन्टबाबत वारंवार सूचना केल्या होत्या. पण त्यांनी हे गांभीर्याने न घेतल्याने सरकारकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

कोणकोणते ओटीटी केले ब्लॉक?
ड्रीम्स फिल्म्स
वूवी
येस्मा
अनकट अड्डा
ट्राय फ्लिक्स
एक्स प्राइम
निओन एक्स व्हिआयपी
बेशर्मास
हंटर्स
रॅबिट
एक्स्ट्रामूड
न्यूएफ्लिक्स
मूडएक्स
मोजफ्लिक्स
हॉट शॉट्स व्हिआयपी
फुगी
चिकूफ्लिक्स
प्राइम प्ले

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ajit Pawar : लोकसभेच्या प्रचाराआधी अजित पवारांना मोठा धक्का ! कोर्टाने दिले ‘हे’ आदेश

Nilesh Lanke : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील पक्षप्रवेशाबाबत निलेश लंके यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Pune News : पुण्यातील ‘या’ कंपनीवर ईडीची कारवाई; ‘एवढ्या’ कोटींची मालमत्ता केली जप्त

Nashik News : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत मोठा गोंधळ; ‘या’ मोठ्या नेत्याला करण्यात आली धक्काबुक्की

Pratibha Patil : माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील रुग्णालयात दाखल

RBI : RBI कडून ‘या’ 2 मोठ्या बँकांवर दंडात्मक कारवाई

Pawanmuktasana : पवनमुक्तासन करण्याचे काय आहेत फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!