Nashik News

Nashik News : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत मोठा गोंधळ; ‘या’ मोठ्या नेत्याला करण्यात आली धक्काबुक्की

467 0

नाशिक : नाशिकमधून (Nashik News) एक मोठी बातमी समोर आली आहे. राहुल गांधी हे सध्या भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांची आज नाशिकच्या चांदवडमध्ये सभा होणार आहे. मात्र या सभेपूर्वी मोठा गोंधळ उडाला आहे. माकप नेते आमदार जे. पी. गावित यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे.

राहुल गांधी यांच्या सभेसाठी ज्या नेत्यांची यादी बनवण्यात आली होती. त्यामध्ये माकपचे नेते आमदार जे. पी. गावित यांचं देखील नावं होतं. या सभेला उपस्थित राहण्यासाठी गावित सभास्थळी पोहोचले. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना पोलीस आणि राहुल गांधी यांच्या सुरक्षा रक्षकांनी अडवले. त्यानंतर तिथे मोठा गोंधळ निर्माण झाला. पोलीस आणि राहुल गांधी यांच्या सुरक्षा रक्षकांकडून जे. पी. गावीत यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्या या सभेला शरद पवार, संजय राऊत, नाना पटोले असे सर्वच इंडिया आघाडीतील महाराष्ट्रातील प्रमुख नेते उपस्थित आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pratibha Patil : माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील रुग्णालयात दाखल

RBI : RBI कडून ‘या’ 2 मोठ्या बँकांवर दंडात्मक कारवाई

Pawanmuktasana : पवनमुक्तासन करण्याचे काय आहेत फायदे?

Share This News
error: Content is protected !!