Pratibha Patil

Pratibha Patil : माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील रुग्णालयात दाखल

359 0

पुणे : देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील (Pratibha Patil) यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना पुण्यातील भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत इन्फेक्शन आणि तापामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रतिभा पाटील यांना बुधवारी रात्री येथील भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर तेथे उपचार सुरु आहेत. त्यांना ताप असून छातीत इन्फेक्शन झाले आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे, असे रुग्णालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

प्रतिभा पाटील ह्या भारताचे राष्ट्रपतीपद भूषवलेल्या पहिल्या महिला आहेत. 2007 ते 2012 दरम्यान त्या राष्ट्रपती पदावर होत्या.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

RBI : RBI कडून ‘या’ 2 मोठ्या बँकांवर दंडात्मक कारवाई

Pawanmuktasana : पवनमुक्तासन करण्याचे काय आहेत फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!