Accident Video

Accident Video : मंत्र्याच्या ताफ्यातील वाहनानं IPS अधिकाऱ्याला चिरडलं; Video आला समोर

574 0

हैदराबाद : वृत्तसंस्था – तेलंगणामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने राज्यात खळबळ उडाली (Accident Video) आहे. यामध्ये मंत्र्याच्या ताफ्यातील एका वाहनानं सहाय्यक पोलीस निरीक्षकाला उडवले. या घटनेत पोलीस अधिकारी जखमी झाला आहे. तेलंगणाच्या भद्रादी कोठागुडेम जिल्ह्यातील भद्राचलममध्ये ही घटना घडली आहे. परितोष पंकज असे जखमी झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.

काय घडले नेमके?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी हे भद्राचलमच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांना भेटायला आलेल्या मंत्र्यांपैकी एका मंत्र्याच्या ताफ्यातील एका वाहनानं बंदोबस्ताच्या ड्युटीवर तैनात असलेल्या परितोष पंकज यांना धडक दिली.धडक बसल्यामुळे ते खाली पडले. या अपघाताचा एका व्हिडीओ देखील समोर आला आहे.

पंकज यांना उपचारासाठी तातडीनं स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी हैदराबादला हलवण्यात आलं आहे. या अपघातामध्ये पारितोष पंकज यांच्या उजव्या डोळ्याजवळ फॅक्चर झालं आहे. त्यांचं ऑपरेशन करण्यात आलं असून, ते सध्या हैदराबादमधील एका रुग्णालयात उपचार घेत आहेत. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ustrasana : उष्ट्रासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे ?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!