Amit Shah

Mahayuti Seat Sharing : ‘…तरच जागा मागा’, अमित शाहांनी शिंदे-पवारांना स्पष्टपणे सांगितलं

614 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात (Mahayuti Seat Sharing) आज नवी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक पार पडणार होती. मात्र केंद्रीय निवडणूक समितीमधील भाजपाचे राज्याचे नेतेच आज दिल्लीला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांचा आजचा दौरा रद्द झाला आहे.

अमित शहांनी दिले ‘हे’ संकेत
शुक्रवारी रात्री शिंदे, अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी दिल्ली दौरा केला होता. मात्र त्यावर तोडगा निघाला नाही. तरी महाराष्ट्रावर सध्या भाजपा फार जास्त प्रमाणात अवलंबून असल्याने केंद्रातूनही जागावाटपामध्ये जास्त तडजोड करण्याची तयारी नसल्याचं चित्र दिसत आहे. जिंकण्याची क्षमता असलेल्या जागांचीच मागणी करा असा थेट संदेशच अमित शाहांनी शिंदे, पवारांना दिला असल्याचं समजते. शुक्रवारी रात्री 1 वाजेपर्यंत चालेल्या बैठकीमध्ये शाहांनी हे संदेश दिल्याचे समजते.

कसे असेल जागांचे समीकरण ?
महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. या 48 जागांपैकी भाजपा 32 ते 36 जागांवर लढण्याच्या तयारीत आहे. शिंदे गटाला 8 ते 10 जागा मिळण्याची शक्यता असून अजित पवार गटाला 6 ते 8 जागांवर समाधान मानावे लागेल अशी एक शक्यता व्यक्त केली जात आहे.

‘या’ 6 जागांवरून महायुतीमध्ये वाद?
समोर आलेल्या माहितीनुसार राज्यातील 48 जागांपैकी 42 जगांबद्दल कोणतेही मतभेद नसले तरी उर्वरित 6 जागांवर कोण लढणार यावरुन बरेच मतभेद आहेत. त्यामध्ये नाशिक, परभणी, सातारा, शिरूर, गडचिरोली, संभाजीनगर या 6 जागांचा समावेश आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Lok Sabha Elections : MIM राज्यात लोकसभेच्या ‘एवढ्या’ जागा लढवणार; जलील यांनी केली मोठी घोषणा

Baramati Loksabha : शिवतारे पराभवाचा वचपा काढणार? विजय शिवतारे यांनी थोपटले दंड

Mumbai Coastal Road : मुंबईतील कोस्टल रोड अखेर खुला!

ST bus Accident : जळगावमध्ये एसटी बसचा भीषण अपघात

Electoral Bonds : इलेक्ट्रोल बॉन्डची माहिती 24 तासांत जाहीर करा; सुप्रीम कोर्टाचे स्टेट बँकेला आदेश

Sharad Pawar : निलेश लंकेंच्या पक्षप्रवेशावर शरद पवारांनी दिले ‘हे’ स्पष्टीकरण

Maratha Reservation : जालन्यात मध्यरात्री पोलीस आणि मराठा आंदोलकांमध्ये जोरदार राडा

Accident News : देवदर्शन घेऊन घरी परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; 6 जणांचा मृत्यू

Nagpur News : खळबळजनक ! नागपूरमध्ये मांजर चावल्याने 11 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Chandrapur News : धक्कादायक ! 41 पोलीस जवानांना पोलीस कॅन्टीनमधील जेवणातून विषबाधा

Tadasana : ताडासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!