Mumbai Coastal Road

Mumbai Coastal Road : मुंबईतील कोस्टल रोड अखेर खुला!

4131 0

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज दक्षिण मुंबईतील वरळी ते मरीन ड्राइव्ह दरम्यानच्या कोस्टल रोडच्या (Mumbai Coastal Road) दक्षिणेकडे जाणाऱ्या कॉरिडॉरचे उद्घाटन करण्यात आले. मुंबई कोस्टल रोडचे बांधकाम 13 ऑक्टोबर 2018 रोजी सुरू झाले असून त्याचा अंदाजित खर्च 12,721 कोटी रुपये आहे. पहिल्या टप्प्यात साडेदहा किलोमीटर लांबीचा हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. वरळी सीफेस, हाजी अली इंटरचेंज आणि अमर्सन इंटरचेंज पॉईंटवरून वाहनचालक कोस्टल रोडवर प्रवेश करू शकतात आणि मरीन लाइन्स येथे बाहेर पडू शकतात.

आता या कोस्टल रोडची वैशिष्ट्ये जाणून घेऊया
प्रवेशद्वार
बिंदू माधव ठाकरे जंक्शन
रजनी पटेल जंक्शन (लोटस जंक्शन)
अमरसन्स गार्डन

एक्झिट पॉईंट
अमरसन्स गार्डन
मरीन ड्राइव्ह (प्रिन्सेस स्ट्रीट ब्रिज)

यावर वाहनांची वेगमर्यादा किती असणार?
सरळ रस्त्यावर- 80 किमी/प्रतितास
बोगद्यात- वळणावर 60 किमी किमी/प्रतितास
वळणावर आणि प्रवेश किंवा बाहेर पडताना किमी/प्रतितास

कोणत्या वाहनांना परवानगी?
बेस्ट व एसटी बस वगळून सर्व प्रकारची अवजड वाहने, ट्रेलर, मिक्सर, ट्रॅक्टर, अवजड मालवाहू वाहने, वाहने वाहून नेणारे प्रवासी आणि सर्व मालवाहू वाहनांना या रोडवर परवानगी देण्यात आलेली नाही. याशिवाय, सर्व प्रकारची दुचाकी, सायकल व अपंग व्यक्तींच्या मोटारसायकल व स्कूटर, सर्व प्रकारची तीनचाकी, जनावरे ओढलेल्या गाड्या, टांगा व हातगाड्यांनादेखील या ठिकाणी परवानगी नाकारण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

ST bus Accident : जळगावमध्ये एसटी बसचा भीषण अपघात

Electoral Bonds : इलेक्ट्रोल बॉन्डची माहिती 24 तासांत जाहीर करा; सुप्रीम कोर्टाचे स्टेट बँकेला आदेश

Sharad Pawar : निलेश लंकेंच्या पक्षप्रवेशावर शरद पवारांनी दिले ‘हे’ स्पष्टीकरण

Maratha Reservation : जालन्यात मध्यरात्री पोलीस आणि मराठा आंदोलकांमध्ये जोरदार राडा

Accident News : देवदर्शन घेऊन घरी परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; 6 जणांचा मृत्यू

Nagpur News : खळबळजनक ! नागपूरमध्ये मांजर चावल्याने 11 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Chandrapur News : धक्कादायक ! 41 पोलीस जवानांना पोलीस कॅन्टीनमधील जेवणातून विषबाधा

Tadasana : ताडासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!