Sharad Pawar Shirur

Sharad Pawar : निलेश लंकेंच्या पक्षप्रवेशावर शरद पवारांनी दिले ‘हे’ स्पष्टीकरण

462 0

पुणे : वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर पक्षाचे अजित पवार गट आणि शरद पवार (Sharad Pawar) गट असे दोन गट पडले आहे. अनेकांनी शरद पवार यांची सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार गटात प्रवेश केला. आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले.

शरद पवार यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे ?
* निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी राजीनामा का दिलाय याची कारणमिमांसा स्पष्ट झालेली नाही याची आम्हला काळजी आहे.
* इ डी आणि इतर तपास यंत्रणांचा गैरवापर सुरुय. याचे उदाहरण कर्नाटकातील डी के शिवकुमार यांच्या उपस्थितीत बाबतीत पहायला मिळाले. कर्नाटकातील दोन नंबरच्या मंत्र्याला अटक करण्यात आली होती.
* महाराष्ट्रात देखील याची सुरुवात झालीय. अनिल देशमुख आणि संजय राऊत यांना विनाकारण अटक करण्यात आली.
* रोहित पवारांच्या बातमीत देखील त्यांच्या कारखान्याच्या जप्तीची प्रक्रिया सुरु करण्यात आलीय. अवसायानात निघालेले निम्म्याहून अधिक कारखाने पंचवीस कोटीहून कमी रकमेला विकले गेले. रोहित पवारांच्या कंपनीने कारखाना पन्नास कोटींना विकला गेला.
* इ डी च्या पाच हजार केसेसपैकी फक्त पंचवीस केसेसचा निकाल लागलाय. त्यातील किती प्रकरणात लोक दोषी आढळलेत याचे प्रमाण शुन्य टक्क्यांहून कमी आहे.
* इ डी ने कारवाई केलेल्यांपैकी एकही व्यक्ती भाजपचा नाही. सगळेच विरोधी पक्षातील आहेत.
* 2004 ते 2014 या कॉंग्रेसच्या सत्तेच्या कालावधीत इ डी ने 26 कारवाया केल्या. त्यातील 4 नेते कॉंग्रेसचे होते तर तीन नेते भाजपचे होते. याचा अर्थ कॉंग्रेसच्या सत्ताकाळात इ डी चा गैरवापर होत नव्हता.
* इ डी चा उपयोग दहशत निर्माण करण्यात येतय.
* (रोहित पवारांना अटक होईल का ) याबाबत भरवसा नाही कारण अनिल देशमुख आणि संजय राऊत यांना देखील अटक करण्यात आली होती.
* ( रवींद्र वायकरांच्या ) बाबतीत देखील असच दिसतय.
* निवडणूक आयुक्त नेमण्याच्या नियमात बदल केलाय.
* महाविकास आघाडीत जागावाटपाचा फार प्रश्न उरलेला नाही. फक्त प्रकाश आंबेडकर यांच्या बाबतीत निर्णय होणे बाकी सर्व आहे.
* प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा सुरुय. त्यांच्या हेतुबाबत मी आत्ता शंका घेणार नाही. त्यांनी सोबत घेण्याचा प्रयत्न सुरु आहे.
* देशपातळीवर फक्त तृणमूल काँग्रेस बाबत प्रश्न आहे. त्यांनी पश्चिम बंगालमधे वेगळा लढण्याचा निर्णय घेतलाय.
* निलेश लंकेंबाबत मला ठाऊक नाही. ही चर्चा मी तुमच्याकडूनच ऐकली.
* भाजपला घटना बदलायचीय.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maratha Reservation : जालन्यात मध्यरात्री पोलीस आणि मराठा आंदोलकांमध्ये जोरदार राडा

Accident News : देवदर्शन घेऊन घरी परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; 6 जणांचा मृत्यू

Nagpur News : खळबळजनक ! नागपूरमध्ये मांजर चावल्याने 11 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Chandrapur News : धक्कादायक ! 41 पोलीस जवानांना पोलीस कॅन्टीनमधील जेवणातून विषबाधा

Tadasana : ताडासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!