Manoj Jarange

Manoj Jarange : मनोज जरांगेंवर ‘त्या’ प्रकरणी दीड महिन्यानंतर गुन्हा दाखल

650 0

पुणे : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या अडचणीमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यावर पुण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासह वाघोलीतील समन्वयकांवर दीड महिन्यानंतर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधीही मनोज जरांगेंवर बीड आणि नांदेड या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते.

‘या’ अंतर्गत गुन्हा दाखल?
मराठा आरक्षणासाठी जानेवारीमध्ये मुंबईच्या दिशेने उपोषणासाठी जात असताना वाघोलीत पहाटे सार्वजनिक ठिकाणी विना परवाना स्पिकर लावून, सभा घेऊन कायद्याचे उल्लंघन केल्याने मनोज जरांगे पाटील यांच्यासह वाघोलीतील मराठा समन्वयकांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलीस नाईक रितेश काळे यांनी फिर्याद दिली असून जरांगे पाटील यांच्यासह गणेश म्हस्के, संदीप कांबीलकर, शेखर पाटील व इतर आठ ते दहा लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल दीड महिन्यानंतर लोणीकंद पोलिसांनी गुरुवारी संध्याकाळी उशिरा गुन्हा दाखल केला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Accident : लग्नासाठी मुलगी बघायला निघालेल्या कुटुंबाचा दुर्दैवी अंत

Sophia Leone Death : अ‍ॅडल्ट फिल्म स्टार सोफिया लिओनचे निधन

Pune News : पुण्यात ड्युटी मिळाली नाही म्हणून पीएमपी चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न

Bakasana : बकासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide