Pune News

Pune News : पुण्यात ड्युटी मिळाली नाही म्हणून पीएमपी चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न

462 0

पुणे : पुण्यातून (Pune News) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये ड्युटी न मिळाल्यामुळे एका बदली हंगामी रोजंदारीवरील पीएमपी चालकाने झाडावर चढून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने पोलीस प्रशासन आणि अग्निशामन यंत्रणा वेळीच घटनास्थळी दाखल झाल्याने चालकाला रोखण्यात यश आले. पीएमपीएमएलच्या पुणे स्टेशन आगारात शनिवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

पी एम पी मध्ये बदली हंगामी म्हणून काम करत असलेला चौरे म्हणून चालकाने काम न मिळाल्यामुळे झाडावरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याला आगारातील इतर सहकाऱ्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र आगारातील राजकारण आणि मानसिक त्रासाने त्रस्त झालेल्या या चालकाने थेट झाडावर चढून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे 👇क्लिक करा
https://www.facebook.com/reel/1637334747069982

या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि अग्निशामन दलाल घटनास्थळी दाखल झाले. तब्बल तासाभराने समजूत काढल्यानंतर चालकाला झाडावरून खाली उतरवण्यात यश आले. या प्रकाराचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Bakasana : बकासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!