R. Ashwin

Ravichandran Ashwin : अश्विनने मुरलीधरनचा 18 वर्ष जुना ‘तो’ रेकॉर्ड मोडला

841 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- धरमशालामध्ये इंग्लंडविरुद्ध खेळलेला सामना हा रविचंद्रन अश्विनच्या (Ravichandran Ashwin) कसोटी कारकिर्दीतील 100 वा सामना होता, जो अतिशय संस्मरणीय ठरला. अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पहिल्या डावात 4 आणि दुसऱ्या डावात 5 बळी घेत एकूण 9 बळी घेतले. यादरम्यान त्याने मुथय्या मुरलीधरनचा खास विक्रम मोडीत काढला आहे.

काय आहे तो विक्रम?
कारकिर्दीतील 100व्या कसोटी सामन्यात आतापर्यंत सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम श्रीलंकेचा महान खेळाडू मुथय्या मुरलीधरनच्या नावावर होता. 2006 मध्ये त्याने बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 87 धावांत 3 बळी घेतले होते, तर दुसऱ्या डावात 54 धावांत 6 बळी घेतले होते. अशाप्रकारे मुरलीधरनने संपूर्ण कसोटी सामन्यात 141 धावांत 9 विकेट घेतल्या.

आता रविचंद्रन अश्विनने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. धर्मशाला येथे खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील पाचव्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात अश्विनने 51 धावांत 4 बळी घेतले. दुसऱ्या डावात त्याने 77 धावांत 5 बळी घेतले. त्याने या कसोटी सामन्यात एकूण 128 धावा देत 9 विकेट घेतल्या आहेत. म्हणजेच आता अश्विनने आपल्या 100व्या कसोटी सामन्यात खेळाडूंकडून सर्वात कमी धावा देत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Nagpur News : भाजपतर्फे कामगारांसाठी आयोजित शिबीरामध्ये मोठा गोंधळ

Thane Accident : ‘तो’ थांबला अन् दोघांचा गेला जीव; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला थरारक मृत्यू

Supriya Sule : सुनेत्रा पवारांच्या गळाभेटीवर सुप्रिया सुळेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Latur Accident : भरधाव कार हॉटेलमध्ये घुसल्याने 2 जणांचा मृत्यू; Video आला समोर

Lok Sabha Elections : ‘…तोपर्यंत आम्ही मविआच्या एकाही कार्यक्रमात सहभागी होणार नाही’ प्रकाश आंबेडकरांचे मोठे विधान

Ind Vs Eng : टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा, 1 इनिंग आणि 64 धावांनी दणदणीत विजय

Pune News : दर्ग्यालगतचे बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी PMC दाखल; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Maratha Reservation : मराठा पुन्हा एकवटणार; मनोज जरांगे यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Beed News : करुणा मुंडेंच्या कार्यक्रमात जोरदार राडा

Pune News : बंगळुरू स्फोटाप्रकरणी एनआयएचं पथक पुण्यात दाखल

Bhopal Fire : भोपाळमध्ये मंत्रालयाला भीषण आग; 4 मजले आगीमध्ये जळून खाक

Maharashtra Politics : ठाकरे गटाचा ‘हा’ मोठा नेता पक्षावर नाराज? कार्यकर्त्यांना केले ‘हे’ भावनिक आवाहन

Naukasana : नौकासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News
error: Content is protected !!