Bhopal Fire

Bhopal Fire : भोपाळमध्ये मंत्रालयाला भीषण आग; 4 मजले आगीमध्ये जळून खाक

552 0

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये मंत्रालयाला आग (Bhopal Fire) लागली आहे. वल्लभ भवनाला आग लागली आहे. या आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. वल्लभ भवन राज्य सचिवालयात ही आग लागली आहे.

चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर ही आग पसरली आहे. अग्निशमन दलाचं पथक आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र अजूनही आगीवर नियंत्रण मिळवता आलेले नाही. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maharashtra Politics : ठाकरे गटाचा ‘हा’ मोठा नेता पक्षावर नाराज? कार्यकर्त्यांना केले ‘हे’ भावनिक आवाहन

Naukasana : नौकासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News
error: Content is protected !!