Sharad Pawar

Sharad Pawar : लक्षात ठेवा! शरद पवार म्हणतात मला; आमदार सुनील शेळके यांना पवारांनी भरसभेत दिला इशारा

703 0

लोणावळा : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा (Sharad Pawar) मावळ तालुका कार्यकर्ता संवाद मेळावा लोणावळ्यात सुरू आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मेळावा सुरू असून त्यांनी अजित पवार गटाचे मावळचे आमदार सुनील शेळके यांना थेट इशारा दिला. मेळाव्यासाठी कार्यकर्त्यांनी येऊ नये यासाठी आमदार सुनील शेळके यांच्याकडून दमदाटी केली गेल्याच्या चर्चा आहेत. याच चर्चांवर शरद पवार यांनी आमदार शेळकेंना इशारा दिला आहे.

काय म्हणाले शरद पवार?
शरद पवार यांनी म्हटलं की, मला असं समजलं तुम्ही पदाधिकारी, कार्यकर्ते इकडे येताय म्हणून तुम्हाला धमक्या दिल्या जात आहेत. मी त्यांना सांगेन की सुनील शेळके, तुम्ही आमदार कुणामुळे झाला? तुझ्या सभेला कोण आलेलं? पक्षाचा अध्यक्ष कोण होतं? तुझ्या अर्जावर माझी सही आहे. हे लक्षात ठेवा. यापुढे असं काही केलंत तर मला शरद पवार म्हणतात. विसरू नका. मी त्या वाटेने जात नाही, गेलो तर कोणाला सोडत नाही अशा शब्दात शरद पवार यांनी मेळाव्यातून थेट आमदार सुनील शेळके यांना सुनावलं.

व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://www.facebook.com/reel/2465111993700019

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Yashasvi Jaiswal : ज्याला विराट कोहलीला 6 वर्ष लागली ‘तो’ महाविक्रम यशस्वीने 7 महिन्यात केला

MPSC Job : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत बंपर भरती; ‘या’ ठिकाणी करा अर्ज

Shivsena MLA Disqualification Case : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; शिवसेना, नार्वेकरांबद्दल दिला ‘हा’ आदेश

Mumbai Indians : ‘या’ कारणांमुळे ‘मुंबई इंडियन्स’ची धुरा रोहितऐवजी पंड्याकडे देण्याचा निर्णय घेतला

Pune News : पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात बॅनरबाजी; कष्टाळू कार्यकर्ता कोण?

Nashik News : वाटलं खेळता खेळता बुडाला पण…; नाशिकमधील ‘त्या’ 4 वर्षीय चिमुकल्याच्या मृत्यूचा Video आला समोर

Chandrapur News : चंद्रपुर हळहळलं ! महिलेनं लेकीला विहिरीत ढकललं अन्…

Pune Crime News : सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक येथे कोयते-तलवारीने 10 ते 15 गुंडांकडून तिघांवर हल्ला

Pune News : पुण्यात नवीन टर्मिनलच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला! ‘या’ तारखेपासून सुरू होणार विमानसेवा

Utkatasana : उत्कटासन म्हणजे काय ? काय आहेत त्याचे फायदे?

 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!