Nashik News

Nashik News : वाटलं खेळता खेळता बुडाला पण…; नाशिकमधील ‘त्या’ 4 वर्षीय चिमुकल्याच्या मृत्यूचा Video आला समोर

708 0

नाशिक : नाशिकमध्ये (Nashik News) 4 वर्षीय चिमुकल्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. मुलगा खेळता खेळता पाण्यात पडला असावा असं कुटुंबाला वाटलं. पण त्याच्या मृत्यूनंतर एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे ते पाहून सर्वच हादरले.

काय आहे नेमके प्रकरण?
मालेगावच्या दातारनगर भागामध्ये ही घटना घडली आहे. हसनैन मलिक असे मृत पावलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. 4 वर्षांचा हसनैन आपल्या आजीकडे रहायला आला होता.तो खेळण्यासाठी घराबाहेर गेला होता.पण बराच वेळ होऊन तो घरी परतला नाही म्हणून त्याचा शोध सुरू झाला. यानंतर हसनैन सापडला पण मृत अवस्थेमध्ये.सांडपाण्याच्या डबक्यात त्याचा मृतदेह होता. खेळता खेळता पाण्यात पडून त्याचा मृत्यू झाला असावा असा समज त्याच्या आई वडिलांना झाला होता. मात्र नंतर सीसीटीव्हीमुळे त्याच्या मृत्यूचं खरं कारण समोर आलं. तो खेळताना पाण्यात पडला नव्हता तर त्याला मुद्दामहून फेकलं होतं. शेजारील यंत्रमाग कारखान्याच्या सीसीटीव्हीची तपासणी करण्यात आल्यानंतर त्यात एका मुलाने त्याला उचलून पाण्यात फेकल्याचे आढळून आले. हे दृश्य पाहून सगळ्यांनाच मोठा धक्का बसला.

काय आहे व्हिडिओमध्ये?
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता काही मुलं पाण्याच्या डबक्याजवळ आहेत. एक मुलगा ज्याच्या हातात एक लहान मुलगा आहे ते अगदी पाण्याच्या जवळ आहेत. काही वेळाने मोठा मुलगा त्या लहान मुलाला खाली उतरवतो. त्याच्याशी बोलताना दिसतो त्याला पाण्यात काहीतरी दाखवतो. नंतर त्याला पुन्हा दोन्ही हातात उचलतो आणि थेट पाण्यात फेकून देतो आणि तिथून पळून जातो. इतर 3 मुलं तिथंच थांबतात. मुलाला बुडताना पाहून ते घाबरतात. त्याला वाचवण्यासाठी धडपड करतात पण पाण्यात जाण्याची त्यांचीही हिम्मत होत नाही. पाण्यात पडलेला मुलगाही हातपाय मारतो पण त्याचा काहीच फायदा होत नाही. या प्रकरणी पवारवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हसनैनला पाण्यात फेकणारा मुलगा कोण आहे? त्याने त्याला का फेकले? याचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Chandrapur News : चंद्रपुर हळहळलं ! महिलेनं लेकीला विहिरीत ढकललं अन्…

Pune Crime News : सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक येथे कोयते-तलवारीने 10 ते 15 गुंडांकडून तिघांवर हल्ला

Pune News : पुण्यात नवीन टर्मिनलच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला! ‘या’ तारखेपासून सुरू होणार विमानसेवा

Utkatasana : उत्कटासन म्हणजे काय ? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!