पुणे : पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक (Pune Crime News) येथे दहा ते पंधरा गुंडांनी भर रस्त्यावर तिघांवर कोयते व तलवारींने वार केल्याची घटना समोर आली आहे.यामधील जखमी तरुणांना उपचारासाठी किरकटवाडी फाट्याजवळील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या पाठीवर,पायांवर,हातांवर व कमरेवर खोल जखमा झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
काय घडले नेमके?
काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास गोऱ्हे बुद्रुक येथील बस स्टॉपजवळ दहा ते पंधरा गुंड हातात तलवारी व कोयते घेऊन थांबले होते. दुचाकीवरुन आलेल्या गोऱ्हे बुद्रुक येथील तीन तरुणांवर त्यांनी अचानक हल्ला केला. या तिन्ही तरुणांनी तेथून पळ काढल्याने थोडक्यात बचावले आहेत मात्र मागून हत्याराचे घाव बसल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. हल्लेखोरांनी दुचाकीचीदेखील मोडतोड केली आहे.
यानंतर हे हल्लेखोर पसार झाले. या हल्लेखोरांची अद्याप ओळख पटलेली नाही. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी हवेली पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले होते. भर रस्त्यावर वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे आज कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune News : पुण्यात नवीन टर्मिनलच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला! ‘या’ तारखेपासून सुरू होणार विमानसेवा