Pimpari Chinchwad

Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवड हादरलं ! ठाकरे गटाच्या ‘या’ विभागप्रमुखाच्या मुलाची निर्घृणपणे हत्या

1299 0

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधून (Pimpri-Chinchwad) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये ठाकरे गटाच्या विभागप्रमुखाच्या मुलाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या देहूरोड परिसरात हि घटना घडली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विभाग प्रमुख विजय थोरी यांच्या मुलाचा निर्घृणपणे खून करण्यात आला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विभाग प्रमुख विजय थोरी यांच्या मुलाचा काल मध्यरात्री निर्घृणपणे खून करण्यात आला. विशाल विजय थोरी असे या 23 वर्षीय मृत युवकाचे नाव असून विकास नगर किवळे भागात असलेल्या श्री साई दर्शन कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी च्या जवळच अज्ञात लोकांनी विशालचा दगडाने ठेचून खून केला आहे. विशालचा मृतदेह शव विच्छेदनासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. सदरची घटना ही पूर्व वैमनस्यातून झाली असल्याचा संशय देहूरोड पोलिसांनी व्यक्त केला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Solapur News : कामावर जायला निघाला अन् मरणाच्या दाढेत गेला; मृत्यूचा थरारक Video आला समोर

Loksabha Elections 2024 : भाजप महाराष्ट्रातून किती जागा लढणार? संभाव्य यादी आली समोर

Crime News : ‘या’ भाजप आमदाराच्या पुतण्याची गोळ्या घालून हत्या

Pune Metro : आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोच्या तिसऱ्या मार्गाचे उदघाटन

Shivsena : शिवसेना महिला सेनेचे शिवदुर्गा महिला संमेलन 9 मार्चला होणार

Trikonasana : त्रिकोणासन करण्याचे काय आहेत अद्भुत फायदे ?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!