कात्रज प्राणी संग्रहालयातून पळालेल्या बिबट्याला 48 तासानंतर कात्रज प्राणी संग्रहालयातील बिबट्याला जेरबंद करण्यात प्रशासनाला यश आलंय.
या बिबट्याला जेर बंद करण्यासाठी विविध उपाय योजना केल्या जात होत्या अखेर मंगळवारी रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटांनी या बिबट्याला जेरबंद करण्यात उद्यान विभागाला यश आलाय.
70 हुन अधिक कर्मचारी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करत होते. खाद्य ठेवलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या आला आणि यामध्येच त्याला जेरबंद करण्यात आलं दरम्यान आता बिबट्याला जेरबंद केल्याने पुणेकरांनी सुटकेचा निष्वास सोडलाय.