Wardha Loksabha

Wardha Loksabha : वर्ध्यातून लोकसभेसाठी वंचितकडून संभाव्य उमेदवार म्हणून ‘या’ व्यक्तीच्या नावाची घोषणा

677 0

वर्धा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Wardha Loksabha) जवळ जवळ सर्व पक्षांनी आपल्या संभाव्य उमेदवारांची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं वर्धा लोकसभेच्या संभाव्य उमेदवाराबाबत घोषणा करण्यात आली आहे.

‘या’ व्यक्तीच्या नावाची घोषणा
वंचितच्या जिल्हा कार्यकारिणीत ठराव घेऊन प्राध्यापक राजेंद्र साळुंखे यांच्या नावाची संभाव्य उमेदवार म्ह्णून घोषणा करण्यात आली आहे. वर्धा जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत प्राचार्य राजेंद्र साळुंखे यांचे नाव उमेदवारीबाबत पक्के करण्यात आले आहे. संभाव्य उमेदवार जाहीर करण्याबाबत स्वत: प्रकाश आंबेडकर यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे.

वर्धा जिल्ह्यात लोकसभा उमेदवार घोषित केल्याने सध्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. वंचितचे जिल्हाध्यक्ष मनोज वरखेडे, उपाध्यक्ष सुभाष खंडारे यांनी उमेदवाराची घोषणा केल्याने आता यावर महाविकास आघाडी काय भूमिका घेते ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Accident News : उसडी गावाजवळ शिंदे गटाच्या ‘या’ आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात

Bhujangasana : भुजंगासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?

Share This News
error: Content is protected !!