Bengaluru Cafe Blast

Bengaluru Cafe Blast : बंगळुरू हादरलं ! कॅफेमध्ये भीषण स्फोट; 4 जण जखमी

1087 0

बंगळुरू : वृत्तसंस्था – कर्नाटकची राजधानी बंगळुरूमधून भीषण स्फोटाची (Bengaluru Cafe Blast) घटना समोर आली आहे. यामुळे बंगळुरू शहर हादरलं आहे. एका कॅफेमध्ये हा स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये 4 जण जखमी झाले आहे. या भीषण स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. हा स्फोट कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही.

हाती आलेल्या माहितीनुसार, बंगळुरूमधील रामेश्वर कॅफेमध्ये स्फोट झाला आहे. जुन्या विमानतळ रोडजवळ कुंडलहल्ली परिसरात हा कॅफे आहे.अचानक झालेल्या स्फोटात 4 जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दुपारी 1 वाजताच्या सुमारास हा स्फोट झाला आहे.

राजाजीनगर येथील कॅफेच्या व्हाइटफील्ड शाखेमध्ये हा स्फोट झाला. हा स्फोट नेमका कशामुळे झाला हे समजू शकले नाही. पण स्फोटाची तीव्र इतकी भीषण होती की, कॅफेमधील साहित्याचं मोठं नुकसान झालं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली. हा घातपाताचा कट तर नाही ना, त्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरु आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maratha Reservation : मराठा आरक्षणाविरोधात जयश्री पाटलांकडून हायकोर्टात याचिका दाखल

Buldhana News : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांवर ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल

Shinde Group MLA Fight : शिंदे गटाच्या आमदारांमध्ये जोरदार राडा; शंभूराज देसाईंना करावी लागली मध्यस्थी

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन केली ‘ही’ नवी मागणी

Maharashtra Politics : ‘जर जरांगे पाटलांनी जालन्यातून लोकसभा लढवली तर रावसाहेब दानवे..’ भाजपच्या ‘या’ नेत्याचे मोठे वक्तव्य

Loksabha Election 2024: ‘मविआ’च्या 48 संभाव्य उमेदवारांची यादी आली समोर

Car Accident : केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन यांच्या ताफ्यातील कारचा भीषण अपघात

Weather Update : ‘या’ जिल्ह्यांत आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

Setu Bandha Sarvangasana : सेतुबंधासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!