मुंबई : मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणाचा वाद हाय कोर्टात पोहोचला आहे. राज्य सरकारनं मराठा समाजाला दिलेल्या दहा टक्के आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दिवाणी रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. डॉ. जयश्री पाटील यांच्याकडून ही याचिका दाखल करण्यात आले आहे.
याचिकेत काय म्हंटले?
या याचिकेत 27 फेब्रुवारी रोजी रोस्टर पद्धतीनं केलेल्या बदलाला आव्हान देण्यात आले आहे. निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची आयोगाच्या अध्यक्षपदी झालेली नेमणूक चुकीची असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. तर निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांना सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांपेक्षाही जास्त मानधन दिलं गेलं असल्याचं या याचिकेत म्हटलं आहे.
तर दुसरीकडे याप्रकरणी आरक्षणाला समर्थन देत विनोद पाटील यांच्याकडून हायकोर्टात कॅवेट दाखल करण्यात आली आहे. तर यावेळी कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण दिल्याचा दावा सरकारनं केला आहे. त्यामुळे आता लवकरच मराठा आरक्षणाचा लढा हायकोर्टात सुरू होणार आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Buldhana News : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांवर ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन केली ‘ही’ नवी मागणी
Loksabha Election 2024: ‘मविआ’च्या 48 संभाव्य उमेदवारांची यादी आली समोर
Car Accident : केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन यांच्या ताफ्यातील कारचा भीषण अपघात
Weather Update : ‘या’ जिल्ह्यांत आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता
Setu Bandha Sarvangasana : सेतुबंधासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?