बुलढाणा : बुलढाणा (Buldhana News) येथील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. वाघाची शिकार करुन त्याचा वाघनख गळ्यात लॉकेट म्हणून घातल्याचा दावा करणारा एका व्हिडिओमुळे अडचणीत आलेल्या गायकवाड यांच्या विरोधात जमीन बळकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोराखेडी पोलिसांनी मोताळा न्यायालयाच्या आदेशावरून बुधवारी, 28 फेब्रुवारीच्या मध्यरात्री कारवाई करत हा गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
नागपूर येथील रीता यमुनाप्रसाद उपाध्याय (42 , रा. नागपूर) यांची मोताळा तालुक्यातील राजूर शिवारातील गट नंबर 62 मध्ये दीड एकर शेती आहे. 2021 च्या कोरोना काळात आमदार संजय गायकवाड आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी संगनमत करून ही शेतजमीन बळजबरीने ताब्यात घेतली. या जागेवर आमदार गायकवाड यांना अलिशान फार्म हाऊस बांधण्यासाठी सुरुवात देखील केली. या शेतजमिनीवर अतिक्रमण करून शेतीची कुंपणेही त्यांनी काढून टाकले. सोबतच आपण देत असलेल्या दरात शेतजमीन आपल्या नावावर करून द्यावी, असा तगादाही गायकवाड यांनी उपाध्याय यांच्याकडे लावला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी उपाध्याय यांनी पोलिसांत तक्रार केली होती. मात्र, पोलिसांनी याविषयी फार दखल न घेता कुठलीही कारवाई केली नाही. त्यानंतर उपाध्याय यांनी मोताळा येथील न्यायालयात धाव घेतली असता, आमदार संजय गायकवाड यांच्यासह त्यांचा चिरंजीव मृत्युंजय गायकवाड, सोमनाथ चौबे, दिपाली चौबे आणि ज्ञानेश्वर वाघ यांच्यावर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात भादवी 156(3), 143, 150, 379, 385, 447 आणि 34 नुसार बोराखेडी पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक सारंग नवलकार यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राजवंत आठवले हे करीत आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन केली ‘ही’ नवी मागणी
Loksabha Election 2024: ‘मविआ’च्या 48 संभाव्य उमेदवारांची यादी आली समोर
Car Accident : केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन यांच्या ताफ्यातील कारचा भीषण अपघात
Weather Update : ‘या’ जिल्ह्यांत आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता
Setu Bandha Sarvangasana : सेतुबंधासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?