Nitesh Rane

Nitesh Rane : संजय राऊत यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करा; नितेश राणेंची मागणी

365 0

नाशिक : सलीम कुत्ता सोबत पार्टी केल्याप्रकरणी नाशिकचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला असून संजय राऊत हे देशद्रोही आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

नेमके काय म्हणाले नितेश राणे?
गेल्या अधिवेशनात दाऊदचा जवळचा हस्तक सलीम कुत्ता याच्याबरोबर एका पार्टीचा व्हिडिओ आम्ही सरकारसमोर आणला होता. सलीम कुत्ता हा पेरोलवर बाहेर होता. पे रोल वर असताना तो सुधाकर बडगुजर यांच्यासोबत पार्टी करताना आपल्याला दिसून आला. त्यानंतर ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांच्या पत्रकार परिषदा झाल्यात. प्रत्येक पत्रकार परिषदेत आम्ही त्या गावातलेच नाहीत. सलीम कुत्ता आणि आमचे काहीच संबंध नाहीत, असे सांगण्यात आले. ती पार्टी झाली तिथे सलीम कुत्ता नव्हता, असेही काहीं लोकांकडून सांगण्यात आले.

मात्र पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर हे सिद्ध झालेले आहे की, सलीम कुत्तासोबत बडगुजरच आहे. बडगुजर हा महत्वाचा विषय नाही. पण बडगुजरचा गॉडफादर कोण? बडगुजर कोणाच्या मांडीला मांडी लाऊन नाशिकमध्ये फिरतो? बडगुजर कोणाची गुंतवणूक ठेवतो? तर संजय राऊतची. बडगुजरची चौकशी करत असताना संजय राऊत जो याचा गॉडफादर आहे, त्यामुळे संजय राऊतांचीही चौकशी झाली पाहिजे. संजय राऊतांवर देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे. 1993 च्या बॉम्बस्फोटात ज्या दाऊदचा हात होता . त्याचा हस्तक सलीम कुत्तासोबत यांचे संबंध आता सिद्ध झाले आहेत. गुन्हा दाखल झाला आहे. यावरून स्पष्ट होत आहे की, संजय राऊत हा देशद्रोही आहे, असे नितेश राणे म्हणाले आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Manoj Jarange Patil : वंचित बहुजन आघाडीनंतर आता ‘या’ पक्षाकडून जरांगे पाटलांना लोकसभेची ऑफर

Rohit Pawar : रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ प्रकरणी विधानसभा अध्यक्षांकडून चौकशीचे आदेश

IPL 2024 : कोण आहे IPL चा सर्वात महागडा कर्णधार? कोणाला मिळते जास्त सॅलरी?

Jamtara Train Accident : झारखंडमध्ये रेल्वेचा भीषण अपघात; 2 ठार, अनेक जण जखमी

Leap Day 2024 : लीप इयर म्हणजे काय? काय आहेत यामागच्या रोमांचिक गोष्टी

Mumbai News : खळबळजनक ! चक्क मुख्यमंत्र्यांची खोटी सही आणि शिक्के वापरले

Ahmednagar News : खळबळजनक ! हळदीच्या सोहळ्यात जेवल्याने अहमदनगरमध्ये 200 जणांना विषबाधा

Accident News : दुर्दैवी ! पिकअप गाडीचा भीषण अपघात; 14 जणांचा जागीच मृत्यू

Sudhakar Badgujar : ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्यावर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल

Paschimottanasana : पश्चिमोत्तासन कसे करावे आणि काय आहेत त्याचे अद्भुत फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!