Jamtara Train Accident

Jamtara Train Accident : झारखंडमध्ये रेल्वेचा भीषण अपघात; 2 ठार, अनेक जण जखमी

492 0

झारखंड : वृत्तसंस्था – झारखंडमधील जामतारा येथे भीषण रेल्वे अपघात (Jamtara Train Accident) झाला आहे. यामध्ये ट्रॅकवरुन चालणाऱ्या प्रवाशांवरुन रेल्वे गेल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला तर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. झारखंडची राजधानी रांचीपासून सुमारे 140 किमी अंतरावर कलझारियाजवळ हा अपघात झाला. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत दोन मृतदेह हाती लागले आहेत. सध्या सर्च ऑपरेशन सुरु असून मृतदेहांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी 7 वाजता हा अपघात झाला असून, दोघांचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्याला सुरुवात केली. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

“विद्यासागर-कसितार दरम्यान जाणारी ट्रेन क्रमांक 12254 (अंगा एक्सप्रेस) ER (पूर्व रेल्वे) च्या आसनसोल विभागात संध्याकाळी 7 वाजता एसीपी (अलार्म चेन पुलिंग) मुळे थांबली. संध्याकाळी 7 वाजून 7 मिनिटांनी ट्रॅकवरून चालत असलेल्या दोन व्यक्ती MEMU ट्रेनच्या समोर आले होते. ट्रेन जिथे थांबली होती तिथून किमान दोन किलोमीटर अंतरावर ही दुर्घटना घडली”, अशी माहिती पूर्व रेल्वेकडून देण्यात आली आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला शोक
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या घटनेची दखल घेतली असून शोक व्यक्त केला आहे. “झारखंडच्या जामतारा जिल्ह्यात झालेल्या रेल्वे अपघातात अनेक लोकांच्या आकस्मिक मृत्यूची बातमी अत्यंत दु:खद आहे. मी मृतांच्या कुटुंबीयांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करते,” असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Leap Day 2024 : लीप इयर म्हणजे काय? काय आहेत यामागच्या रोमांचिक गोष्टी

Mumbai News : खळबळजनक ! चक्क मुख्यमंत्र्यांची खोटी सही आणि शिक्के वापरले

Ahmednagar News : खळबळजनक ! हळदीच्या सोहळ्यात जेवल्याने अहमदनगरमध्ये 200 जणांना विषबाधा

Accident News : दुर्दैवी ! पिकअप गाडीचा भीषण अपघात; 14 जणांचा जागीच मृत्यू

Sudhakar Badgujar : ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्यावर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल

Paschimottanasana : पश्चिमोत्तासन कसे करावे आणि काय आहेत त्याचे अद्भुत फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!