Pankaj Udhas Pass Away

Pankaj Udhas Pass Away : ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचं निधन

710 9

मुंबई : मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचं निधन झालं आहे. वयाच्या 72 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दीर्घ आजारामुळे त्यांचे निधन झाले आहे.

पंकज उधास यांनी गझल गायकीच्या क्षेत्रात आपले एक स्थान निर्माण केले.  1980 मध्ये आहत नावाच्या अल्बमच्या मार्फत त्यांनी आपल्या यशस्वी कारकीर्दीची सुरुवात केली.  या अल्बमने त्यांना व्यावसायिक यशाचे दरवाजे खुले झाले. पंकज उधास यांचे मुकरार, तरन्नम, मेहफिल आदी गाणी चांगलीच लोकप्रिय झाली.

Share This News

Comments are closed.

error: Content is protected !!