Internet

Manoj Jarange : जरांगेनी यु टर्न घेतला मात्र तणाव अजूनही कायम; ‘या’ 3 जिल्ह्यात इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद

1005 43

जालना : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप करत थेट त्यांना भेटण्यासाठी मुंबईतील ‘सागर’ बंगल्यावर जाण्यासाठी निघालेले मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) हे माघारी फिरले आहेत. जरांगे पाटलांनी मुंबईला जाण्याचा निर्णय रद्द केला आहे. आज सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपला निर्णय मागे घेत असल्याचे जाहीर केले. या निर्णयानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून जालना, बीड आणि संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

रविवारी दुपारी मनोज जरांगे-पाटील अचानक मुंबईला जायचंय म्हणत अंतरवाली सराटीमधून निघाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांचा एकच गोंधळ उडाला. अंतरवाली सराटीपासून काही किलोमीटरवरील भांबेरी गावातून मागे फिरले. मात्र या कालावधीत तातडीने मोठ्याप्रमाणात पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांना सतर्क करुन जालना आणि बीड जिल्ह्यात संवेदनशील भागांमध्ये तैनात करण्यात आलं.

पोलिसांनी बीड आणि जालन्याच्या सीमांवर चेकपोस्ट उभारले असून सीमा सील केल्या आहेत. बीडमध्ये तब्बल 38 ठिकाणी नाकाबंदी लागू करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात 37 (1)(3) महाराष्ट्र पोलीस कायदा लागू करण्यात आला आहे. बीडमध्ये आज म्हणजेच सोमवारी (26 फेब्रवारी रोजी) दुपारी 4 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बीड प्रमाणेच जालना आणि छत्रपती संभाजी नगरमध्येही इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maratha Reservation : मराठा आंदोलक आक्रमक! जालन्यातील तिर्थपुरीत एसटी बस पेटवली

Weather Update : आज राज्यातील ‘या’ भागात पाऊस बरसणार; हवामान खात्याने वर्तवला अंदाज

Share This News

Comments are closed.

error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide