मुंबई : कलाविश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ‘माया दर्पण’ आणि ‘तरंग’ सारखे चित्रपट बनवणारे दिग्दर्शक कुमार साहनी (Kumar Shahani) यांचं निधन झालं आहे.ते 83 वर्षांचे होते. त्याच्यावर पासोलिनी आणि तारकोव्स्की सारख्या महान लोकांचा प्रभाव होता. कथानक दाखवण्याच्या वेगळ्या शैलीमुळं ते प्रसिद्ध होते. दिग्दर्शक असण्यासोबतच ते शिक्षक आणि लेखकही होते. त्यांनी आजवर ‘द शॉक ऑफ डिझायर अँड अदर एसेस’ हे पुस्तक लिहिलं आहे. त्यांच्या निधनानं हळहळ व्यक्त केली जात आहे.
कुमार साहनी यांच्याविषयी थोडक्यात माहिती
कुमार साहनी यांचा जन्म 7 डिसेंबर 1940 साली लारकाना येथे झाला. त्यानंतर ते कुटुंबासोबत मुंबईत स्थायिक झाले. त्यांनी पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मध्ये शिक्षण घेतलं आहे. ते दिग्दर्शक ऋत्विक घटक यांच्या आवडत्या विद्यार्थ्यांपैकी एक मानले जायचे. पुढे कुमार साहनी फ्रान्सला गेले आणि चित्रपट निर्माते रॉबर्ट ब्रेसन यांच्या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. ऋत्विक घटक आणि रॉबर्ट ब्रेसन यांना आपलं गुरू मानलं होतं.
कुमार साहनी यांनी निर्मल वर्मा यांच्या कथेवर आधारित ‘माया दर्पण’ हा चित्रपट बनवला होता. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म कॅटेगरीत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. कुमार साहनी यांनी ‘तरंग’, ‘ख्याल गाथा’, ‘कसबा’ आणि ‘चार अध्याय’ यासह अनेक उत्तमोत्तम चित्रपटांचं दिग्दर्शन केले आहे. कुमार साहनी यांनी केवळ राष्ट्रीय पुरस्कारच जिंकले नाहीत तर त्यांनी वेगवेगळ्या वेळी 3 फिल्मफेअर पुरस्कारही जिंकले होते.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
WPL 2024 : शोभना आशाने 5 विकेट्स घेऊन रचला इतिहास
Weather Update : पुढील 3 दिवसांत राज्यात ‘या’ ठिकाणी कोसळणार पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा