Pune Accident : पुण्यातील नवले ब्रिजजवळ भीषण अपघात; ट्रकची 8 ते 9 वाहनांना धडक

478 0

पुणे : पुण्यातील (Pune Accident) नवले पुल अपघाताचे हॉटस्पॉट बनत चालले आहे. आताच हाती आलेल्या माहितीनुसार नवले पुलाजवळ पुन्हा विचित्र अपघात झाला आहे. यात आठ ते नऊ वाहने एकमेकांना धडकली आहेत. या अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

कसा घडला अपघात?
ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. या विचित्र अपघातात आठ ते नऊ वाहने एकमेकांना धडकली असून काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी (24 फेब्रुवारी) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडला. कात्रजकडून (देहू रस्ता) नवले पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवले पुलाच्या सिग्नलच्या अगोदर हा विचित्र अपघात घडला. या महामार्गावर एका ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर थांबलेल्या वाहनाला धडक दिली. त्यामुळे विचित्र अपघात घडला.

या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. या अपघातातील जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या नव्या चिन्हाचे शरद पवार यांच्या हस्ते अनावरण

Pune Video : घरासमोर झोपलेल्या कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला; पुण्यातील धक्कादायक घटना

Pune Bus Accident : पुण्याला निघालेल्या बसचा भीषण अपघात

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!