बीड : मनोज जरांगे यांच्या समर्थकाच्या गाडीची तोडफोड केल्याची घटना (Beed Crime) ताजी असताना अजून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राम खाडे यांची गाडी जाळण्यात आली आहे. बीडच्या आष्टी तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पेट्रोल टाकून गाडी जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
काय घडले नेमके?
राम खाडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसचे आष्टी मतदार संघाचे अध्यक्ष आहेत. या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आष्टी तालुक्यातील कन्हेवडगाव येथिल राम खाडे यांनी राहत्या घरासमोर गाडी (एमएच २३, एएस ३०४४) उभी केली होती. मध्यरात्री 1 वाजता चार अज्ञात तरुणांनी तोंडाला रुमाल बांधून घराजवळ आले. त्यांनी गाडीवर पेट्रोल टाकून पेटवून दिली. यानंतर गाडीवर दगडफेक केली. या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Ind Vs Eng : रविचंद्रन अश्विनने रचला इतिहास; इंग्लंडविरुद्ध केले ‘हे’ ‘अनोखं शतक’
Sanket Bhosle Murder Case : संकेत भोसले हत्या प्रकरणी मुख्य आरोपी कैलास धोत्रेला अटक
Lasya Nandita : धक्कादायक ! भीषण अपघातात ‘या’ तरुण महिला आमदाराचा मृत्यू
Rajendra Patni : कारंजाचे आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन