R. Ashwin

Ind Vs Eng : रविचंद्रन अश्विनने रचला इतिहास; इंग्लंडविरुद्ध केले ‘हे’ ‘अनोखं शतक’

848 0

भारत आणि इंग्लंडदरम्यान (Ind Vs Eng) पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्याला आजपासून सुरुवात झाली. या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सान्यात टीम इंडियाचा दिग्गज अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने इतिहास रचत एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आर अश्विनने इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये अनोख्या शतकाची नोंद केली आहे. आर अश्विनने इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 100 विकेटचा टप्पा पूर्ण केला आहे.

आर अश्विनने रचला इतिहास
आर अश्विनने इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये शतक ठोकत इतिहास रचला आहे. इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. अश्विनच्या आधी इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिव विकेट घेण्याचा विक्रम भारताचे दिग्गज लेग स्पिनर भागवत चंद्रशेखर यांच्या नावावर होता. चंद्रशेखर यांनी इंग्लंडविरुद्ध 23 कसोटी सामन्यात 27.27 च्या अ‍ॅव्हरेजने तब्बल 95 विकेट घेतल्या होत्या. 107 धावात 9 विकेट ही चंद्रशेखर यांची इंग्लंडविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी होती.

इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 1000 धावा आणि 100 विकेट घेणारा तो एशियातला पहिला खेळाडू बनला आहे. आर अश्विनने इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 1085 धावा केल्या आहेत. अश्विनने इंग्लंडविरुद्ध अवघ्या 23 कसोटी सामन्यात 100 विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. अश्विनने भारतासाठी 99 आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात आतापर्यंत 502 विकेट घेतल्या आहेत. यात त्याने तब्बल 34 वेळा पाच विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. तर 8 वेळा 10 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sanket Bhosle Murder Case : संकेत भोसले हत्या प्रकरणी मुख्य आरोपी कैलास धोत्रेला अटक

Manohar Joshi : सुसंस्कृत नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला; मुख्यमंत्री शिंदेंनी मनोहर जोशींना वाहिली श्रद्धांजली

Lasya Nandita : धक्कादायक ! भीषण अपघातात ‘या’ तरुण महिला आमदाराचा मृत्यू

Rajendra Patni : कारंजाचे आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन

Jitendra Awhad : आमच्या पक्षानं ‘तुतारी’ हे चिन्ह मागितलंच नव्हतं; जितेंद्र आव्हाड यांचा धक्कादायक खुलासा

Solapur Crime : शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखावर गुन्हा दाखल

Manohar Joshi : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!