jitendra-awhad

Jitendra Awhad : आमच्या पक्षानं ‘तुतारी’ हे चिन्ह मागितलंच नव्हतं; जितेंद्र आव्हाड यांचा धक्कादायक खुलासा

237 0

ठाणे : ‘निवडणूक आयोगाकडे आमच्या पक्षानं ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे पक्षचिन्ह मागितलंच नव्हतं. आम्ही इतर तीन चिन्हं सुचवली होती, पण आयोगानं स्वत:हूनच हे चिन्ह दिलं,’ असा दावा पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केला आहे.

नेमके काय म्हणाले जितेंद्र आव्हाड ?
निवडणूक आयोगाकडे आम्ही ज्या तीन निशाणी सुचविल्या होत्या. त्यातील चिन्ह न देता आम्हाला त्यांनी “तुतारी” हे चिन्ह दिले. लढण्यासाठी शुभेच्छाच दिल्या आहेत. हा आमच्यासाठी ‘शुभसंकेत’ आहे. याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार मानतो. कारण, त्यांनी सांकेतिक भाषेत ‘तुम्ही युद्धाला उभे रहा आणि जिंका’ असाच संदेश शरद पवार नावाच्या योद्ध्याला आणि त्यांच्या सैनिकांना “तुतारी” हे चिन्ह देऊन दिला आहे असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

शरद पवार यांच्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ या पक्षाला नवं निवडणूक आयोगाकडून नवे चिन्ह देण्यात आले आहे. निवडणूक आयोगानं ‘तुतारी फुंकणारा माणूस’ हे चिन्ह ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ या पक्षाला दिले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Solapur Crime : शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखावर गुन्हा दाखल

Manohar Joshi : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!