Accident News

Accident News : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू

678 0

मुंबई : राज्यात अपघाताचे (Accident News) प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले आहेत. मुंबई – पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर ओजेर्ड गावच्या हद्दीत हा अपघात झाला आहे.

कसा घडला अपघात ?
मुंबईवरून पुण्याला येताना पहाटेच्या सुमारास कार चालकाने मालवाहू कंटेनरला मागच्या बाजूने जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. या कारमध्ये सात प्रवासी प्रवास करत होते. या भीषण अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले आहेत.

या अपघातातील जखमींना सोमाटणे फाट्यावरील पवना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मयुरी थोरात आणि सुनील थोरात अशी या अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावं आहेत. तर अक्षय थोरात, दत्तात्रय थोरात, तेजल थोरात, श्रद्धा थोरात आणि राजीव थोरात हे पाचजण या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pimpri-Chinchwad : पिपरी- चिंचवडमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई

Maratha Reservation : मनोज जरांगेंनी पुन्हा उगारले आंदोलनाचं अस्त्र

Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवडमधील मोरवाडी परिसरात टायरच्या गोडाऊनला भीषण आग

Parbhani News : महावितरणाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर ! शॉक लागून 3 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमणाच्या कारवाईदरम्यान पोलीस आणि नागरिकांमध्ये जोरदार राडा

Pune Crime : पुण्याचं उडता पंजाब होतंय का? आतापर्यंत पुणे पोलिसांकडून 2000 किलो एमडी ड्रग्ज जप्त

Zeeshan Siddique : काँग्रेसकडून झिशान सिद्दीकीची मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षपदावरून हकालपट्टी

Ameen Sayani Pass Away: रेडिओच्या सुवर्णयुगाचे शिल्पकार अमीन सयानी यांचे निधन

Share This News
error: Content is protected !!