पिंपरी चिंचवड : पिपरी- चिंचवड (Pimpri-Chinchwad) पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर एका इसमाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून तब्बल 5 लाख 40 हजारांच मेफेड्रोन ड्रग्स जप्त केलं आहे. शहजाद आलाम अब्बास कुरेशी (वय-38) अस ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. शहजाद आलम अब्बास कुरेशी याने मेफेड्रॉन ड्रग्स मुंबईतील रिझवान चाँदीवालाकडून आणल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.
पुणे शहरापाठोपाठ पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ड्रग्स तस्करी विरोधात कारवाई केली असून आरोपीकडून दहा लाखांची महागडी चारचाकी गाडी असा एकूण १६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पिंपरी- चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुना पुणे- मुंबई महामार्गावर अज्ञात व्यक्ती मेफेड्रोन घेऊन येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Maratha Reservation : मनोज जरांगेंनी पुन्हा उगारले आंदोलनाचं अस्त्र
Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवडमधील मोरवाडी परिसरात टायरच्या गोडाऊनला भीषण आग
Parbhani News : महावितरणाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर ! शॉक लागून 3 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Pune Crime : पुण्याचं उडता पंजाब होतंय का? आतापर्यंत पुणे पोलिसांकडून 2000 किलो एमडी ड्रग्ज जप्त
Zeeshan Siddique : काँग्रेसकडून झिशान सिद्दीकीची मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षपदावरून हकालपट्टी
Ameen Sayani Pass Away: रेडिओच्या सुवर्णयुगाचे शिल्पकार अमीन सयानी यांचे निधन