मुंबई : काँग्रेसचे माजी वरिष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसचा हात सोडत (Zeeshan Siddique) राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला. अजित पवार यांच्या गटात प्रवेश केल्यानंतर आता बाबा सिद्दीकी यांच्या मुलावर काँग्रेसकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकी हे आमदार असून मुंबई युवक काँग्रेसचं अध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे होती मात्र आता त्यांची या पदावरून हकालपट्टी करून त्यांच्याकडून हे पद काढून घेतले.
https://www.facebook.com/reel/1415732432405308
बाबा सिद्दीकींनी पक्ष सोडल्यानंतर आमदार झिशान सिद्दीकीसुद्धा काँग्रेसला राम राम करणार अशा चर्चा आहेत. पण अद्याप त्यांनी पक्ष सोडलेला नाही. झिशान सिद्दीकांना पदावरून हटवल्यानंतर त्यांच्या जागी अखिलेश यादव यांच्यावर मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. काँग्रेसने नुकतेच देशातील काही राज्यांच्या युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीत बदल केले. यात मुंबईच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुफियान मोहसिन हैदर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोण आहे बाबा सिद्दीकी ?
बाबा सिद्दीकी हे महाराष्ट्रात काँग्रेस सरकारच्या काळात मंत्री होते. बाबा सिद्दीकी हे काँग्रेसचे मुंबईतील दिग्गज नेते मानले जात होते. ते 1999 ते 2009 पर्यंत सलग तीन वेळा आमदार राहिले आहेत. राज्य मंत्री म्हणून काम केलं. त्याआधी 1992 आणि 1997 मध्ये ते नगरसेवकही होते. काँग्रेस सोडण्याआधी बाबा सिद्दीकी हे मुंबई प्रादेशिक काँग्रेस समिती आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या संसदीय बोर्डाचे अध्यक्ष आणि वरिष्ठ उपाध्यक्ष होते.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Ameen Sayani Pass Away: रेडिओच्या सुवर्णयुगाचे शिल्पकार अमीन सयानी यांचे निधन