Manoj Jarange

Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्या आयुष्याचा वेध घेणाऱ्या ‘संघर्षयोद्धा’चं शूटिंग पूर्ण; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

971 0

जालना : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या आयुष्यावर आधारित ‘संघर्षयोद्धा-मनोज जरांगे पाटील’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतचं या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालं आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या ठिकाणी या सिनेमाचे शूटिंग करण्यात आले. हा चित्रपट येत्या 26 एप्रिल 2024 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

‘संघर्षयोद्धा – मनोज जरांगे पाटील’ या सिनेमाची निर्मिती सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेतर्फे करण्यात आली असून मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेते रोहन पाटील यांनी साकारली आहे. गोवर्धन दोलताडे यांनी सिनेमाची कथा आणि निर्मिती केली असून सुधीर निकम यांनी पटकथा आणि संवाद लेखन केले आहे, तर शिवाजी दोलताडे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

या चित्रपटातील स्टारकास्टबद्दल जाणून घेऊया
‘संघर्षयोद्धा’ या सिनेमात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर , सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके, यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

IPL 2024 : अखेर ठरलं ! ‘या’ तारखेपासून सुरू होणार आयपीएलचा 17 वा सिझन

Maratha Reservation : मराठा समाजास आरक्षण लागू केल्याने छत्रपती संभाजीराजेंनी मुख्यमंत्री आणि सरकारचे मानले आभार

Cricketers Retirement : खळबळजनक ! एकाचवेळी ‘या’ 5 क्रिकेटर्सने केली निवृत्तीची घोषणा

HSC Board Exam 2024 : उद्यापासून 12 वीच्या परीक्षेला सुरुवात; शिक्षण मंडळाने आणला ‘हा’ नवीन नियम

Maratha Reservation : मराठा आरक्षण विधानसभेत एकमताने मंजूर

Ajit Pawar : वादा तोच पण, दादा नवा…! राष्ट्रवादीच्या फुटीनंतर झळकलेल्या ‘त्या’ बॅनरची राजकीय वर्तुळात चर्चा

Maratha Reservation : आधी ‘ती’ मागणी मान्य करा अन् नंतरच..; अधिवेशनापूर्वी जरांगे पाटलांची आक्रमक भूमिका

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!