Rituraj Singh

Rituraj Singh : ‘अनुपमा’ फेम ऋतुराज सिंह यांचे हार्ट अटॅकने निधन

738 0

मुंबई : बॉलीवूड विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. बॉलिवूड तसेच हॉलिवूड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते ऋतुराज के सिंह (Rituraj Singh) यांचे हार्ट अटॅकने निधन झाले आहे. ते 59 वर्षांचे होते. 19 फेब्रुवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानं सिनेसृष्टी तसेच टेलिव्हिजन विश्वात शोककळा निर्माण झाली आहे. सिनेसृष्टीतून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

या अभिनेत्याने ‘अपनी बात’, ‘ज्योती’, ‘हिटलर दीदी’, ‘शपथ’, ‘वॉरियर हाय’, ‘आहट’, ‘अदालत’, ‘दिया और बाती’ यांसारख्या हिट मालिकेत महत्वपुर्ण भूमिका साकारल्या आहेत.ऋतुराज हे टेलिव्हिजनचा ओळखीचा चेहरा होते. ‘अनुपमा’ या प्रसिद्ध मालिकेत त्यांनी रुपाली गांगुलीसोबत स्क्रिन शेअर केली होती. या मालिकेत त्यांनी एका रेस्टारंटच्या मालकाची भूमिका साकारली होती.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ajit Pawar : वादा तोच पण, दादा नवा…! राष्ट्रवादीच्या फुटीनंतर झळकलेल्या ‘त्या’ बॅनरची राजकीय वर्तुळात चर्चा

Maratha Reservation : आधी ‘ती’ मागणी मान्य करा अन् नंतरच..; अधिवेशनापूर्वी जरांगे पाटलांची आक्रमक भूमिका

Share This News
error: Content is protected !!