हिंदवी स्वराज्याचे सम्राट छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj Jayanti) यांची तारखेनुसार 19 फेब्रुवारी 2024 रोजी 394 वी जयंती आहे. देशभरात रयतेच्या राजाचा जन्मदिवस अतिशय मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. पण तुम्हाला माहितेय का महाराजांची शिवजंयती वर्षातून दोनदा साजरी केली जाते. तर ती दोन वेळा का साजरी केली जाते? नेमका हा वाद काय आहे त्याबद्दल आज जाणून घेऊया…
2 वेळा कधी शिवजयंती साजरी केली जाते?
छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रावर असलेल्या विजापूरच्या आदिलशाहीचा आणि मुघलांचा बिमोड करत हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. अशा या छत्रपती शिवाजी महाराजांची शिवप्रेमींकडून दोन वेळा शिवजयंती साजरी केली जाते. एक शिवजयंती 19 फेब्रुवारी रोजी तर दुसरी शिवजयंती तिथीनुसार साजरी केली जाते. यंदा 2024 मध्ये शिवजयंती तिथीनुसार 28 मार्च रोजी साजरी केली जाणार आहे
नेमका वाद काय?
संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतरही महाराष्ट्र सरकारमध्ये शिवरायांच्या जयंतीच्या वादाचे पडसाद पाहायला मिळतात. 1966 मध्ये इतिहासकारांच्या समवेत एक समिती स्थापन करण्यात आली होती. याद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांची तारीख निश्चित करण्याासाठी सांगण्यात आले होते. यात समितीतून शिवरायांचा जन्म हा 19 फेब्रुवारी 1630 ला झाला आहे या निष्कर्षावर आले होते तर इतिहासकार एन.आर. फाटक यांनी 6 एप्रिल 1927 ला झाला असल्याचे समितीसमोर मांडले होते. तेव्हाही अनेक इतिहासकारांमध्ये मतभेद असल्याचे लक्षात आले होते. जे आजही पाहायला मिळतात. अनेक इतिहासकार या विषयावर आजही बोलणे टाळतात.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Shiv Jayanti 2024 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 394 व्या जयंतीनिमित्त शिवनेरीवर शिवभक्तांची गर्दी